विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातुन रमेश आडसकर यांचा वाढदिवस साजरा !


गरजूंना किराणा किट सह रुग्णांना फळ वाटप ;
मिनाज पठाण यांचा स्तुत्य उपक्रम

केज : प्रतिनिधी

आंबासाखर कारखान्याचे संचालक तथा सोनीजवळा ग्रामपंचायत गटनेते मिनाज पठाण यांनी विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातुन केज व माजलगाव मतदारसंघाचे भाजपा जेष्ठ नेते रमेशरावजी आडसकर यांचा वाढदिवस साजरा केला.वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालय केज येथे रुग्णांना केळी, सफरचंद,पाणी बॉटल व पालावरील हतावर पोट असणाऱ्या गोरगरीबांना किरणा किटचे वाटप केले.माजलगाव मतदारसंघाचे जेष्ठ नेते रमेशरावजी आडसकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध उपक्रम राबविले. यावेळी केज उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.केंद्र,डॉ.इंगोले,रक्त पुरवठा विभागातील प्रमुख नागरगोजे सर,पत्रकार दशरथ चवरे, रमेश गुळभिले,रामदास तपसे,धनंजय कुलकर्णी,रंजित घाडगे,मुबशीर खतीब,सनी शेख,ग्रा.प सदस्य देवीदास जोगदंड,सेवा सहकारी सोसायटीचे व्हाइस चेअरमन,हुसेन पटेल,आसेफ पठाण,योगिराज काळे,पप्पु पवार व इतर मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

तर या कार्यक्रमाचे आयोजन आंबासाखर कारखान्याचे संचालक तथा सोनीजवळा ग्रामपंचायत गटनेते मिनाज पठाण यांनी यांनी केले होते.दरम्यान मिनाज पठाण यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की मला गोरगरीब हातावरची पोट असणारे मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवणारे तसेच उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी सुद्धा ग्रामीण भागातील गोरगरीब लोक त्यांना डब्याची ही सोय कमी जास्त प्रमाणात होत असते त्यामुळे एक वेळचं का होईना वाढदिवसानिमित्त आपण फळ वाटप करून हातावरचे पोट असणारे मजूर लोकांना दोन-चार दिवसाचा किराणा दिला त्यात आपल्याला आनंद मिळाला व खऱ्या अर्थान वाढदिवस साजरा झाला अशी भावना व्यक्त केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!