“हम दो हमारे बारा” फिल्मवर तात्काळ बंदी करा-तालेब इनामदार
प्रदर्शितकरणार्या सिनेमागृहांवर तोडफोड करण्यात येईल एमआयएमचा इशारा
केज : प्रतिनिधी
मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू घेऊन काही समाजकंटक नविन नविन स्टोरी तय्यार करुन कश्मिर फाईल,केरळ फाईल अशी सिनेमे तयार करून मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू घेऊन समाजा समाजा मध्ये मतभेद करण्याचा घाणेरडा प्रकारला वेळीतच रोखुन अश्या समाजकंटकांवर कार्यवाही करुन तात्काळ गुन्हे दाखल करावे तसेच मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावण्यार्या फिल्म “हम दो हमारे बारा” ला तात्काळ बंदी घाला नसता एमआयएम पक्षातर्फे सिनेमागृहात तोडफोड करण्यात येईल असा इशारा एमआयएम शहराध्यक्ष तालेब इनामदार यांनी सांगितले आहे.
मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू घेऊन काही समाजकंटक केरळ फाईल,कश्मिर फाईल अश्यासारख्या अनेक फिल्म बनवुन मुस्लिम समाजाला टार्गेट करून देशाचे वातावरण खराब करण्यात येत असल्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यामुळे काही घटना घडल्यास हयाला जिम्मेदार सरकार,प्रशासन,पोलिस प्रशासन आहे त्यामुळे अश्या समाजकंटकांवर कार्यवाही करुन तात्काळ चौकशी करुन कारवाई करावे तसेच मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न करणारे “हम दो हमारे बारा”फिल्मवर तात्काळ बंदी घालावे नसता लोकशाही मार्गाने एमआयएम पक्षातर्फे तिव्र आंदोलन करुन सिनेमागृहांची तोडफोड करण्यात येईल हयाची जिम्मेदारी प्रशासनाची राहील अशी मागणी एमआयएम शहराध्यक्ष तालेब इनामदार यांनी सांगितले आहे.यावेळी,केज एम आय एम शहर अध्यक्ष तालेब इनामदार,जमियत उल्मा ए हिंद तालुका अध्यक्ष,लियाकत भाई शेख,मसीयोद्दीन भाई इनामदार,वाहेद भाई शेख,रईस शेख,अजिम सय्यद,फेरोज पठाण,अमेर तांबोळी,नाजेम शेख,खुद्दुस मोमीन,शाहबाज शेख,तय्यब पठाण,व आदी उपस्थित होते.