श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयाची दहावीच्या परीक्षेत यशाची परंपरा कायम
चि.शैलेश पदमुले प्रथम,कु.अपर्णा शिंदे द्वितीय तर चि.आर्यन गोरे तृतीय
गितांजली लव्हाळे : बीड
बीड शहरापासून जवळच असलेल्या शिदोड येथील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनींनी घवघवीत यश मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केले. या मध्ये चि. शैलेश पदमुले याने 94.20 टक्के गुण घेऊन शाळेतून
प्रथम कु. अपर्णा शिंदे हिने 92.00 गुण घेऊन द्वितीय तर चि.आर्यन गोरे याने 88.60 टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकावला आहे.
शाळेच्या सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचे शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा सौ. सुदामतीताई वाघ मॅडम, सचिव श्री. गोविंदराव वाघ साहेब शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षकवृंद पालक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक कार्य शुभेच्छा दिल्या.
याबाबत अधिक माहिती अशी की मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल आज दि. 27 मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. या मध्ये बीड शहरापासून जवळ असलेल्या शिदोड येथील शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळ बीड संचलित श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयाचा 95 टक्के निकाल लागला आहे.या शाळेने दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी आपल्या यशाची परंपरा कायम ठेवली. यामध्ये चि. शैलेश पदमुले याने 94.20 टक्के गुण घेऊन शाळेतुन प्रथम क्रमांक मिळविला. कु. अपर्णा शिंदे हिने 92.00 गुण घेऊन द्वितीय क्रमांक मिळविला तर चि. आर्यन गोरे याने 88.60 टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकावला आहे.या यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांसह इतर दहावी बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून यशाची परंपरा कायम ठेवली. त्याचबरोबर शाळेतील बहुतांश विद्यार्थ्यांना 85 टक्के पेक्षा अधिक गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.
त्याबद्दल सर्व दहावी बोर्ड परीक्षेतील यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकवृंदाचे शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा सौ सुदामतीताई वाघ मॅडम, सचिव श्री. गोविंदराव वाघ साहेब शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय चव्हाण सर, श्री आत्माराम वाव्हळ सर, श्रीमती फाटे मॅडम श्रीमती साळुंके मॅडम,श्रीमती सानप मॅडम, श्री गणेश गुजर सर,सचिन यादव,वचिष्ट शिंदे, तान्हाजी मोरे,बाबाराम थोरात यांच्यासह शिक्षणप्रेमी नागरिक आणि पालकांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.