महाराणी ताराबाई विद्यालयाची दहावीच्या उज्वल यशाच्या निकालाची परंपरा कायम !
कु.चंदनशिव प्रिया ९६.४०% प्रथम, कु.बारटक्के मयुरी ९५.०० % व्दितीय, कु.थोरात खुशी ९४.६० % तृतीय.
वडवणी : गितांजली लव्हाळे
राज्य शिक्षण मंडळाचा इयत्ता १० वी चा निकाल घोषित झाला असुन संस्कार शिक्षण मंडळ वडवणी,संचलित महाराणी ताराबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल ९६.९८ % लागला. प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी उज्वल यशाच्या निकालाची परंपरा विद्यालयाने कायम ठेवली आहे.
सविस्तर वृत्तांत असा की,महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,पुणे यांनी मार्च- २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवार दि.२७ मे २०२४ रोजी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला.या मध्ये वडवणी शहरातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराणी ताराबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीच्या परीक्षेचा ९६.९८ % निकाल लागला आहे. प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी विद्यालयाने उज्वल यशाच्या निकालाची परंपरा कायम ठेवली ठेवली आहे.महाराणी ताराबाई विद्यालयातून कु.चंदनशिव प्रिया अप्पासाहेब ९६.४०% गुण घेऊन प्रथम क्रमांक आला आहे तर ९५.०० % गुण घेऊनक कु.बारटक्के मयुरी मनोज हीने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे तर कु.थोरात खुशी सुभाषराव ९४.६०% गुण घेऊन तृतीय क्रमांक आला आहे तर ९०.००% च्या पुढे गुण घेऊन पास होणारे विद्यार्थी ११ आहेत तर विशेष प्राविण्य घेऊन उत्तीर्ण होणारे विद्यार्थी संख्या ११४ तसेच प्रथम श्रेणी ९७ व द्वितीय श्रेणी ३९ तर पास झालेले विद्यार्थी ७ आहेत.
या यशाबद्दल संस्कार शिक्षण मंडळाचे सचिव तथा माजी आमदार केशवराव आंधळे तसेच विद्यालयाच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा युवा नेते संजय भाऊ आंधळे, वडवणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रंजीत भैय्या धस,संस्थेचे संचालक इंजि.अशोक भैय्या आंधळे व विद्यालयाचे प्राचार्य राऊत सर,उपप्राचार्य मस्के सर,पर्यवेक्षक धाईतिडक सर,श्री.डोईफोडे सर,श्री.ठोंबरे सर,श्री.धस सर,श्री.कुलकर्णी सर,श्री.चोले सर,श्री.घोळवे सर,श्रीमती फलके मॅडम,श्रीमती घुले मॅडम यांच्यासह विद्यालयातील शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी,पालक व मार्गदर्शक शिक्षक-शिक्षिकांचे कौतुक करून अभिनंदन केले व सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.