औसा तालुक्यात जलजीवन मिशनच्या कामामुळे अनेक गावातील रस्त्याचे वाजलेकी बारा !
पावसाळ्याच्या तोंडावर रस्ते दुरुस्ती होणार का ?
औसा : जीवन जाधव
ग्रामीण भागात दरवर्षी उन्हाळ्यात पाणीबानी होत असल्याने,नागरीकांना पाण्यासाठी वणवण फीराव लागत आहे यासाठी, महाराष्ट्रात होत असलेली पाणीबानी लक्षात घेउन सरकारच्या वतिने ग्रामिन भागात जलजीवन मिशन योजना राबवण्यात आली खरी पण उन्हाळा संपत आला तरीही अनेक गावात जलजीवन मिशन योजना अर्धवटच असल्याच चिञ असुन,कुठे विहीर झाली,तर कुठे पाणी साठवण टाकी तयार नाही अन कुठे पाणी टाकी तयार असेल तर,काही गावात पाईपलाईन चे काम झाल नाही,अशा तर्हेने कंञाटदारांच्या हलगर्जीपणा व जलजीवनच्या संथ गतीने चालु असलेल्या कामा मुळे अनेक गावोगावी जलजीवन मिशन योजना अर्ध्यावरच थांबली असल्याच गावोगावी बोलल जातय,तालुक्यातील अनेक गावात ग्रामपंचायतच्या माध्यमातुन पेव्हर ब्लाॅक व सिमेंट रस्त्याचे कामे झाली असुन,ग्रामस्थांच्या सुख सोईसाठी गल्लो गल्लीतील रस्ते गुळगुळीत झाले खरे पण जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातुन पाईपलाईन,व प्रत्येक घरी नळ देण्याच्या नावाखाली अनेक सिमेंट रस्ते व पेव्हर ब्लाॅक रस्ते गावोगावी खोदुन ठेवले असुन नागरीकांना या खोदुन ठेवलेल्या रस्त्यामुळे अनेक नागरीकांना दैनंदिन प्रवास करताना अनेक अडचनीचा सामना करावा लागतोय,ग्रामिण भागात कंञाटदारांना खोदलेले रस्ते दुरुस्तीची मागणी केली असता रस्ते दुरुस्ती करु अस सांगीतल जात,माञ रस्त्याची दुरुस्ती केली जात नसुन रस्ता दुरुस्तीकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न कंञाटदाराकडुण केला जातोय.
तरी संबंधीत आधिकार्यांनी जलजीवन मिशन कंञाटदारांना तातडीचे रस्ता दुरुस्ती आदेश देउन ग्रामिन भागातील जलजिवन पाईपलाईन साठी खोदलेले रस्ते पावसाळा सुरु होण्या आगोदर रस्ते दुरुस्ती करुन दयावे अशी तालुक्यातील अनेक गावातील ग्रामस्थांची मागणी आहे.