डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्य विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप !
भंडारा-सानगडी : केतना कोहरे
महामानव क्रांतिसूर्य बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त आज दि. १४ एप्रिल २०२४ रोजी जि.प. प्राथमिक शाळा केसलवाडा,पो.भिवखिडकी ता.साकोली येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘मागेल त्याला मदत’ या शीर्षकाखाली गावातील विद्यार्थ्यांमध्ये शालेय शिक्षणाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने शुभमभाऊ लांजेवार यांच्याकडून ग्राम केसलवाडा येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी गावच्या सरपंचा मा.श्रीमती निलीमाताई खोब्रागडे,माजी सरपंच सत्यभामाबाई बावणे,माजी सरपंच श्री. होमराजजी गजभिये,ग्रा.से.पवनजी भोयर,प्रमोद कुंभलकर सर,खेमचंद्रजी सोनवाने,प्रतिक लांजेवार,सौरभ राउत हे प्रामुख्याने उपस्थित होते.