शेतकरी वनहक्कापासून वंचित


भंडारा : केतना कोहरे

जिल्ह्यातील अनेक शेतकरी वनजमिनीवर अतिक्रमण करून शेती करीत आहेत.मागील अनेक वर्षांपासून त्यांनी जमिनीवर कब्जा करून उदरनिर्वाह करीत आहेत.वनहक्क सरकार अंतर्गत अतिक्रमणधारकांना शेतीचे पट्टे दिले जात आहेत.मात्र,वनहक्क प्रस्तावात अनेक अटी असल्यामुळे अतिक्रमणधारक वनहक्कापासून शेकडो शेतकरी वंचित असल्याची माहिती मिळाली आहे.भंडारा वनाने व्यापला आहे.अनेक लोक वन जमिनीवर अतिक्रमण करून शेतीचे कामे करीत आहेत. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये वनजमिनीवर अतिक्रमण करून शेती करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. सरकारच्यावतीने गरजू अतिक्रमणधारकांना वनहक्क अधिनियम अंतर्गत जमीनीचे पट्टे दिले जात आहेत.यासाठी संबंधित अतिक्रमणधारकांना वनहक्क समितीच्या माध्यमातून वनहक्कासाठी सरकारकडे प्रस्ताव पाठवावे लागते.या प्रस्तावात अनेक अटी असल्यामुळे अतिक्रमणधारकांना वनहक्काचा लाभ मिळण्यास अडचण निर्माण होत आहे.यामुळे अनेक गरजू अतिक्रमणधारकांना या वन हक्कापासून वंचित राहावे लागत आहे.

Advertisement

▪️पट्टे मिळुनही शासकीय योजनेपासून वंचित का ?

मागील कित्येक वर्षांपासून शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून शेती व्यवसाय करून शेतकरी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत.अशा शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने वनहक्क पट्ट्याचे वाटप सुद्धा करण्यात आले आहे. मात्र सदर मिळालेल्या पट्ट्याच्या जागेचे इ पीक होत नाही.त्यामुळे शासकीय योजनेचा कसल्याही प्रकारचा फायदा शेतकऱ्यांना होत नसल्याने शेतकऱ्यात रोष व्यक्त करण्यात येत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!