महाविकास आघाडीने आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवू-शेतकरीपुत्र बजरंग सोनवणे
केज : सनी शेख
मागील निवडणुकीत दुर्दैवाने यश आले नाही. मात्र आपण सर्वजण लोकशाहीतील सर्वोच्च अधिकार असणाऱ्या मतांचे शस्त्र घेऊन खंबीरपणे पाठीशी राहणार हा विश्वास आहे. त्यामुळे आपला विजय निश्चित आहेच, यात शंका नसल्याचेही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शेतकरी पुत्र बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केला.
सलग दुसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार, शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व मित्रपक्षाच्या महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून माझ्या नावाची घोषणा झाली. एका सामान्य शेतकरीपुत्रावर पुन्हा एकदा विश्वास टाकल्याबद्दल मी देशाचे नेते खा. शरदचंद्र पवार यांचे हृदयपूर्वक आभार व्यक्त करतो अशी उमेदवारी जाहीर होताच पहिली प्रतिक्रिया बजरंग सोनवणे यांनी दिली.
मागील अनेक वर्षे कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना समाजकारण व राजकारणात काम करतो आहे. येडेश्वरी साखर कारखान्याच्या माध्यमातून माझ्या शेतकरी राजाची अखंड सेवा करतोय. पवार साहेबांनी आज माझ्यावर विश्वास टाकत सलग दुसऱ्यांदा उमेदवारी दिली. त्याही पेक्षा यानिमित्ताने सर्वसामान्यांची करता येणारी जनसेवा व लोकसंवाद आपल्याला महत्त्वाचा आहे. बीडच्या या देवभूमीवर क्रांतिकारी बदल घडवायचे आहेत. जीडीपी देशाचा असतो, राज्याचा असतो. माझ्या मनात मात्र आपल्या बीडचा जीडीपी अर्थात दरडोई उत्पन्न वाढवण्याचा दृढनिश्चय आहे. आपल्या जिल्ह्याचा मागासलेपण दूर करत विकासाचा एक अध्याय आपण सर्वजण मिळून रचू. हाच तो क्षण आहे. मागच्या वेळेस ज्यांनी मला साथ दिली. त्यांचा सन्मान व स्वाभिमान जपण्यासाठी मी लढणार आहे. लढाई मोठी धामधुमीची आहे. पण तुमचा हात डोक्यावर असताना या शेतकरी पुत्राला काळजीचं कारण नाही. जनता आपल्या पाठीशी उभी राहील असा ठाम विश्वासही सोनवणे यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीचे बीड लोकसभा मतदारसंघाचे अधीकृत उमेदवार श्री. बजरंग मनोहर सोनवणे यांचा दि. ५ एप्रिल २०२४ रोजीचा नियोजित भेटी दौरा
धानोरा, ता. आष्टी – स. ०९.००
कडा, ता. आष्टी – स. ९.३०
धामणगाव, आष्टी. – स. १०.००
अमळनेर, ता. पाटोदा- स. १०.३०
पिंपळवंडी, ता. पाटोदा – स. ११.००
डोंगरकिन्ही, ता. पाटोदा – स. ११.३०
श्री क्षेत्र नारायणगड, ता. बीड – १२.१५
साक्षाळपिंपरी, ता. बीड – दु. १.०० वा
मादळमोही, ता. गेवराई – दु.१.३०
पाडळसिंगी, ता. गेवराई – दु. १.४५
गेवराई – दु. २ वाजता ( राष्ट्रवादी कॅाग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाच्या गेवराई विधानसभा मतदारसंघाच्या नियोजित बैठकीस उपस्थिती)
तालखेड फाटा – ३.००
माजलगाव – दु. ४.००
तेलगाव, ता. धारुर – ५.००
धारुर – ५.३०
केज – ६ वाजता