महामानवांच्या विचारांशी अभिप्रेत समाज निर्मिती काळाची गरज-बाळासाहेब मस्के
तलवाडा येथे संत रविदास व कक्कया महाराज जयंती उत्सव साजरा
बीड/प्रतिनिधी
गेवराई तालुक्यातील तलवाडा याठिकाणी संत रविदास महाराज व संत कंक्कया महाराज यांची संयुक्त जयंती दि.२४ फेब्रुवारी २०२४ रोजी राजमाता जिजाऊ कॉम्प्लेक्स ग्रामपंचायत तलवाडा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.प्रथम प्रतिमेचे पूजन करून गुरू रविदास महाराज आणि संत कक्कया महाराज समाज बांधव आणि प्रमुख पाहुण्यांनी अभिवादन केले.यावेळी व्यासपिठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष बीड जिल्हा परिषदचे मा.सभापती बाळासाहेब मस्के,ज्येष्ठ व्यापारी बाबु आप्पा शेटे,माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड.सुरेश हात्ते,युवराज डोंगरे,संत रविदास प्रतिष्ठानचे अध्यक्ष आप्पा सोनटक्के,सरपंच विष्णू हात्ते,उपसरपंच आक्रम सौदागर,राष्ट्रवादी किसान आघाडी प्रेदेशाध्यक्षा पुजाताई मोरे,चर्मकार संघटनेचे रविनाना बोराडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
चर्मकार बांधवांच्या वतीने तलवाडा येथे चर्मकार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी रविदास महाराज आणि कंक्कया महाराज यांच्या जयंती निमित्त महामनवांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सर्व समाज बांधवांच्या वतीने अभिवादन करून कार्यक्रमास आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा महापुरुषांचे पुस्तक देवून स्वागत केले यावेळी ॲड.सुरेश हात्ते,बाळासाहेब मस्के,युवराज डोंगरे,दादाराव रोकडे,गणेश कचरे,विस्तार अधिकारी उनवने साहेब,डोंगरे सर यांनी आपले विचार व्यक्त करतांना महामानवाच्या विचारांशी अभिप्रेरित समाज काळाची गजर असल्याचे प्रतिपादन केले,संतांनी विज्ञानवादी विचारधारा समाजात देवून एकसंघ मानवतावादी समाज करण्यासाठी प्रयत्न केले आणि त्याच विचारावर आजच्या समाज बांधवांनी पुढे चालावे अभी भावना व्यक्त केली.
यावेळी सतीश गांधले यांची मुलगी राघिनी ह्या विद्यार्थिनी ने आपले मनोगत व्यक्त करत अभिवादन केले.या कार्यक्रमास रवी मरकड,शेख रफिकभई,प्रा.शाम कुंड सर,शेख खलिल भाई,ग्रामविकास अधिकारी मस्के साहेब,पाटील साहेब,बापू गाडेकर,गणेश काळे,मदन हतागले,दत्ताभाऊ हात्ते,किशोर हात्ते,कचरू मरकड,बप्पा सोनटक्के,नितीन बोबडे,शेख खिजरभाई,जितेंद्र खरात,जयदेव शिंगणे,बाळासाहेब शिंगारे,पत्रकार विष्णू राठोड,अल्ताफ कुरेशी,शेख अतिक,सुमेध करडे,रोशन हात्ते,आकाश कांबळे,सुरेश गांधले,समाज बांधव राजाराम खंडागळे, शेषेराव पोटे,गणेश गांधले,संतोष गांधेल, करन गांधले,भीम वाघमारे,मदन वाघमारे,शुभम घोडके,बाब गोरे, पिनु गोरे,शहादेव खंडागळे, वैजीनाथ गांधले,राहुल खंडागळे,राजेश खंडागळे,दीपक वाघमारे,बळीराम वाघमारे, नाथा कावळे,रवींद्र गांधले,ब्रम्हा वाघमारे,सुनील गोरे,यांच्या सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.