शेतकऱ्यांनी कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा-कृषी अधिकारी पठाडे
केज : प्रतिनिधी
Advertisement
जिल्हा कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने २४ ते २८ फेब्रुवारी दरम्यान बीड शहरात ‘जिल्हा कृषी महोत्सवा’ चे आयोजन करण्यात आले आहे. कृषी महोत्सवाचा केज तालुक्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केज तालुका कृषी अधिकारी सागर पठाडे यांनी केले आहे. महोत्सव छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर होत आहे. कृषी महोत्सवात शासकीय योजनेचीही माहिती दिली जाणार आहे. तसेच शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्रीही करता येणार आहे.