दरोड्याचा तयारीत असलेली दरोडेखोरांची टोळी पोलिसांच्या जाळ्यात


रिव्हॉल्व्हर आणि जिवंत काडतुसासह फिल्मी स्टाईलने पाठलाग करून दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या

गौतम बचुटे/केज 

देशी बनावटीचा गावठी कट्टा व पाच जिवंत काडतुस जवळ बाळगुन दरोडयाच्या तयारीत असलेल्या सराईत टोळी केज पोलिसांनी फिल्मी स्टाईलने सापळा रचून ताब्यात घेतली.

दि.२० फेब्रुवारी रोजी सहायक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली आहे की, केज ते अंबाजोगाई महामार्गावर लूटमार करण्याच्या उद्देशाने अंबाजोगाई कडुन नेकनूरकडे एक पांढऱ्या रंगाची सुझुकी इर्टिगा चारचाकी गाडी क्रमांक MH-46-CM-1934 मध्ये बसुन येत अशी बातमी मिळाल्याने त्यांनी त्यांचे कार्यालयातील पलिस नाईक विकास चोपने, अनिल मंदे, दिलीप गित्ते, अशपाक ईनामदार,मुंडे तसेच पोलीस स्टेशन के येथील पोलीस उपनिरीक्षक आनंद शिदे, शहादेव म्हेत्रे, महादेव बहिरवाळ, प्रकाश मुंडे यांना सोबत घेवुन केज शहरामध्ये केज ते अंबाजोगाई रोडवर, तांबवेश्वर मेडिकल स्टोअर्स समोर रोडवर सापळा लावून अंबाजोगाई कडून येत असलेल्या पांढ-या रंगाची आर्टिगागाडी क्रमांक MH-46-CM-1934 हिस आड़बुन गाडीतील इसमांना ताब्यात घेवून पोलोम स्टेशन फेज येथे आणून सदर इसभांची व गाढीचो झडती घेतली असला सदर इसमांच्या ताब्यात एक देशी बनावटीचा गावटी कट्टा, पाच जिवंत काडतुस, एक रिकामी मंन्झीन व गाडीमध्ये मध्यल्या शिटखाली एक लोखंडी रॉड, डिक्कीमध्ये एक लोखंडी रॉड, एक लोखंडी स्क्रू ड्राकर व एक लाकडी दांडका मिळून आल्याने ते जप्त करण्यात आले आहेत.

Advertisement

ताब्यात घेतलेल्या इसमांची नावे 01) गणेश पांडुरंग भोसले, रा. यशवंतराव चव्हाण चौक, अंबाजोगाई ता अंबाजोगाई जि. बीड, 02) हरोष तोमर देवडीगा.रा. बनेगली ता. कारकला नि. उडपी राज्य कर्नाटक ह. मु डोंबीवली, मुंबई जि. मुंबई, 03) नारायण मंगळा करण, रा. महेशा ता. कृष्णप्रसाद जि. पुरी राज्य ओडीसा ह.मु. सायन मुंबई, 04) श्रीनिवास आशाआनी बारगम, रा. संत ज्ञानेश्वर नगर गर्नमेंट कॉलनीच्या बाजुला बांद्रा पूर्व मुंबई, 05) श्रावण शिवाजी गायकवाड, रा. बोरीवली मुंबई, 06) दिपक दशरथ चाटे ऊर्फ ताठे,रा. धर्मनाका कामगार नगर-2 मुंबई, 07) नामदेव परसू पोवार, रा. कामोठा नत्री मुंबई ता. पनवेल नि. रायगड असे असून सदर 07 आरोपी विरुथ्य पोना/विकास योपने यांचे फिर्यादी वरुन केन पोलीस स्टेशन येथे कलम 399 भादविसह कलम 3/25 भारतीय हत्यार कायदा नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी गणेश पांडुरंग भोसले यासह इतर आरोपीवर सुध्दा अंबाजोगाई, मुंबई, ठाणे शहरामध्ये दरोडा, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी यासारखे गंभीर गुन्हे दाखान

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बीड श्री. नंदकुमार ठाकुर साहेब, अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई श्रीमतो चेतना तिडके मैडम यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक उपविभाग केज श्री. कमलेश मौना साहेब, पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत महाजन, पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, पोलीस कर्मचारी विकास चोपने, अनिल मंदे, दिलीप गित्ते, अशपाक ईनामदार, मुंबे, शहादेव म्हेत्रे, महादेव बहिरवाळ, प्रकाश मुंडे यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा तपास कमलेश मीना व पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!