पळून जावून प्रेम विवाह केलेल्या जावयाला आणि त्याच्या वडिलांना काठ्या कुऱ्हाडीने मारहाण !
गौतम बचुटे/केज
पळून जाऊन नातेवाईकांच्या इच्छेविरुद्ध प्रेम विवाह केला म्हणून मुलीच्या नातेवाईकांनी जावई आणि त्याच्या वडीलासह कुटुंबातील महिलांना मारहाण केली आहे.
केज तालुक्यातील गदळेवाडी येथील अजय बंकट नाईकवाडे याने एक महिन्यांपूर्वी गावातील पद्माकर जाधव यांच्या मुली सोबत पळून जाऊन आळंदी येथे प्रेमविवाह केला आहे. या लग्नाला मुलीचे वडील पद्माकर जाधव आणि त्यांच्या नातेवाईकांचा विरोध होता.लग्न झाल्या नंतर अजय नाईकवाडे व त्याची पत्नी हे एका आठवड्याने गावी आले त्याचा राग जाधव कुटुंबाला होता दि. २१ जनेवारी रोजी सकाळी ११:०० वा. च्या सुमारास अजय व त्याचे वडील बंकट नाईकवाडे हे शेतात मोटार चालु करण्या जात असताना पद्माकर जाधव, बबन जाधव, भागवत जाधव, सचिन जाधव, सिद्धेश्वर जाधव, बालाजी जाधव, राजेश जाधव, राहूल जाधव, उत्तम जाधव हे हातात काठ्या व कुऱ्हाडी घेऊन त्यांच्या अंगावर धावुन गेले. ते म्हणाले की त्यांच्या मुलीला फसवून व व घरच्यांच्या विरोधात हे लग्न केले आहे.
असे म्हणून त्यांनी सर्वांनी अजय व त्याचे वडील यांना शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारहाण केली. अजयचे सासरे पद्माकर जाधव याने अजय व त्याचे वडील बंकट नाईकवाडे यांच्या डोक्यात लोखंडी रॉडन मारून गंभीर दुखापत केली. तसेच बबन जाधव, भागवत जाधव, सचिन जाधव, सिद्धेश्वर जाधव, बालाजी जाधव, राजेश जाधव, राहुल जाधव, उत्तम जाधव या सर्वांनी मिळून दोघांना लाथाबुक्याने मारहाण करून त्यांचे हातातील काठीने मारहाण केली. तसेच त्याची आई उर्मिला व पत्नी या दोघींना पण केसाला धरून लाथाबुक्याने मारहाण केली व शिवीगाळ केली.
दरम्यान दि. १७ फेब्रुवारी रोजी दवाखान्यातुन सुट्टी झाल्या नंतर अजय नाईकवाडे याच्या फिर्यादी वरून केज पोलिस ठाण्यात पद्माकर जाधव, बबन जाधव, भागवत जाधव, सचिन जाधव, सिद्धेश्वर जाधव, बालाजी जाधव, राजेश जाधव, राहूल जाधव, उत्तम जाधव या नऊ जणांच्या विरुद्ध गु र नं ८१/२२४ भा दं वि १४३, १४७, १५८, १४९, ३२३, ३२६, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार उमेश आघाव हे तपास करीत आहेत.