केजच्या विक्रमराव मुंडे पोद्दार लर्न स्कुलचे स्नेहसंमेलन उत्साहात !
प्रा.माधुरीताई मुंडेंच्या संकल्पनेतून सादर झालेल्या “रामायण कथेने” उपस्थितांची मने जिंकली
केज/प्रतिनिधी
रेणुका माता कृषी विकास प्रतिष्ठान संचलित विक्रमराव मुंडे पोद्दार स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन शनिवार (दि.१०) रोजी अनेक मान्यवर व पालकांच्या उपस्थितीत पार पडले.या स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांनी विविध सामजिक विषय हाताळत उत्कृष्ट नाटिका तसेच नृत्यांद्वारे समाजामध्ये सकारात्मक संदेश पोहोचविला.रेणूका माता कृषी विकास प्रतिष्ठाण संचलित विक्रमराव मुंडे पोद्दार लर्न स्कुल केज या शाळेचे वार्षीक स्नेहसंमेलन शनिवार (दि.१०) रोजी संपन्न झाले.स्नेह संमेलनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष विक्रम (बप्पा) मुंडे व सौ. कृष्णाबाई मुंडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी केजच्या आ.सौ नमिताताई मुंदडा यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यां समवेत सहभाग नोंदवत विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध नाट्य,नृत्याचे कौतुक केले.स्कुलच्या विद्यार्थ्यांनी “रामायण कथेवर” आधारित विविध प्रसंगांचे नाट्यीकरण करून विविध गाण्यांवर उत्तम प्रकारे नृत्याचे सादरीकरण केले.पोदार जम्बो किडच्या विद्यार्थ्यांनी नवीन शैक्षणिक धोरण NEP 2020 यावर आधारित नाटिकेसह नृत्य सादर केले.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विजयकांत मुंडे,संस्थेचे सचिव अतुल मुंडे,सौ.रूपालीताई मुंडे यांनी उपस्थित पालकांचे आभार व्यक्त केले.
तर कार्यक्रमाची यशस्वी संकल्पना प्रा.माधूरीताई मुंडे यांनी पार पाडली.यावेळी शाळेचे प्रा.आनंद मरळगोईकर सर, मुख्याध्यापिका सौ.राधा बन्साळी मॅडम यांच्यासह सर्व शिक्षक वृंद,प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी,शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.यावेळी पालकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.