सोनीजवळा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सी.सी.टीव्ही बसवले


सरपंच सौ.जानवी ससाणे यांनी दिलेला शब्द पाळला !

केज:प्रतिनिधी

केज तालुक्यातील सोनीजवळा येथे १९८० पासून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा बसवण्यात आलेला आहे.केज तालुक्यात एकमेव हा पुतळा असून, आकर्षण आहे.आज दि.१० फेब्रुवारी २०२४ रोजी गावातील सरपंच सौ.जानवीताई गोविंद ससाने यांनी या ठिकाणी कोणताही अनूचित प्रकार घडू नये व पुतळ्याचे संरक्षण व्हावे यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सभागृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून देण्याचा शब्द दिला होता.तो त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून पूर्ण केला आहे.

Advertisement

यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सभागृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून दिल्याबद्दल गावातील सर्व नागरिकांत सरपंच सौ.जानवीताई गोविंद ससाणे यांचे मोठ्या प्रमाणात अभिनंदन करण्यात येत आहे.यावेळी गोविंद बापू ससाणे,दादासाहेब ससाणे,प्रताप वैरागे,बबन जोगदंड, अविनाश ससाणे,बबडु पटेल,शिवाजी गायकवाड,जमिल खुरेशी,सोमनाथ ससाणे,दिपक ससाणे, विकास ससाणे,बाबु गायकवाड,प्रकाश ससाणे,प्रकाश जोगदंड,अरुण पटेकर, श्रीपती जोगदंड,मधू पटेकर,तुकाराम पाखरे,कैलास वरागे, अनुरथ जोगदंड,दिलीप उजगरे,आतूल जोगदंड,उध्दव गिरी,बाळासाहेब ससाणे, अभिमान ससाणे,सोपान ससाणे,विष्णू करपे, व इतर उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!