धर्मगुरु मुफती सलमान अजहरी यांना बेकायदेशीर अटक व गुन्हे मागे घेवुन तात्काळ सुटका करा
केज:प्रतिनिधी
ए आय एम आय एम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.असदुद्दीन ओवेसी व महाराष्ट्रराज्य चे प्रदेश अध्यक्ष खा.इम्तियाज जलील,महाराष्ट्रराज्य चे कार्याध्यक्ष डॉ.गफ्फार कादरी,मराठवाडा अध्यक्ष फिरोज लाला,बीड जिल्हा अध्यक्ष ॲड शेख शफीक भाऊ,यांच्या आदेशान केज येथे ए आय एम आय एम पक्षातर्फे मुफ्ती सलमान अझहरी साहेब यांच्या विरुद्ध गुजरात (ATS) ने चुकीच्या पद्धतीने केलेल्या अटक व कारवाईच्या निषेधार्थ तहसीलदार मार्फत देशाचे माहीम राष्ट्रपती साहेबांना निवेदन देण्यात आले.
त्यांच्यावर दाखल झालेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेऊन त्यांची सुटका करण्यासंदर्भात निवेदन द्वारे मागणी करण्यात आली आहे. यावेळी एम आय एम शहर अध्यक्ष तालेब इनामदार,रजा ॲकडमी तालुका अध्यक्ष हाफ़िज़ मुखीम खतीब साहब,शेख अर्शद पत्रकार, तकी इनामदार,सय्यद अजिम, जियाओदिन काजी,रईस शेख, तय्यब पठाण, फेरोज पठाण,शेख शाहबाज, शेख नाजेम, रमजान भाई,आदि कार्यकर्ते उपस्थित होते.