केज बस डेपो साठी केज विकास संघर्ष समिती पुन्हा रस्त्यावर : उद्या केजडी पुलावर रस्ता रोको !


केज : प्रतिनिधी

केज येथे बसडेपो तात्काळ मंजूर करून सुरू करा या मागणीसाठी केज विकास संघर्ष समितीने पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला असून यासाठी येत्या मंगळवार दि 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता केजडी नदी पुलावर बेमुदत रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा समितीने दिला आहे.

Advertisement

केज हे आता खामगांव-पंढरपूर व अहमदपूर- अहमदनगर या दोन महामार्गाच्या जोडणीवर असलेले महत्वाचे तालुका ठिकाण आहे. येथून दररोज हजारो प्रवाशी महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करतात. मात्र येथून बसव्यवस्थापणाची सुविधा नाही. त्यामुळे प्रवाशी नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. केज शहरात बसडेपोसाठी सात एक्कर हुन अधिक जागा राज्यपरीवहन मंडळासाठी आरक्षित आहे. मात्र आजपर्यँत या जागेवर मंडळाने बसडेपोसह कोणताही उपक्रम न राबवल्याने या जागेवर अतिक्रमण धारकांची नजर बसू लागली असून या जागे भोवतालचे तार कम्पोउंडची तोडफोड झालेली आहे.यासाठी मंडळाने तात्काळ बसडेपो सुरू करणे गरजेचे आहे. बदलत्या काळात महामंडळाने नवीन इलेक्ट्रिक बसगाड्यांचे चार्जिंग स्टेशन सुरू करून केजला वेगळे नांव मिळवून दिले जाऊ शकते.याशिवाय केज बसस्थानकात संरक्षक भिंत बांधकाम करून उभी करणे तसेच बसस्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे 24 तास सुरू ठेवणे, बसस्थानकात सौचालये नव्याने बांधणे व बसस्थानकाची स्वच्छता ठेवणे इत्यादी मागण्या समितीने राज्यपरिवहन मंडळा कडे केल्या असून यासाठी मंगळवारी सकाळी 11 वाजता केजडी नदी पुलावर बेमुदत रस्ता रोको आंदोलन केले जाणार असून नागरिकांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहनही समितीने केले आहे. या निवेदनावर हनुमंत भोसले,नासेर मुंडे,विक्रम घुले इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!