विष्णू चाटे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या केज तालुकाध्यक्षपदी निवड !
केज:प्रतिनिधी
अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.खा.सुनिलजी तटकरे व ना.धनंजय मुंडे यांच्या सुचनेनुसार व वाल्मीक आण्णा कराड,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण,बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली विष्णू चाटे यांची दि.४ फेब्रुवारी २०२४ रोजी केज तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. सर्वसामान्यांची,शेतकऱ्यांची विद्यमान स्थिती बिकट असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रभर सर्वसामान्यांचे मुद्दे उचलत असतो व सर्व सामान्य, शेतकऱी, युवकांना न्याय देण्याचा काम करतो तसेच येत्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सामाजिक कार्यात व जनसामान्यात ओळखीचे असलेल्या लोकांना पक्षाची जबाबदारी दिली जात आहे.
समाजकार्यात पुढे असणारे विष्णू भाऊ चाटे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या केज तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.विष्णू भाऊ चाटे यांच्या निवडी बद्दल शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.