शितलताई लांडगे यांना “लोकरत्न” पुरस्कार जाहीर
केज/प्रतिनिधी
लोकशाही पत्रकार संघाच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रासाठी दिला जाणारा “लोकरत्न पुरस्कार” सामाजिक कार्यकर्त्या शितलताई लांडगे यांना घोषित झाला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक,राजकीय क्षेत्रातील करत असलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांची लोकशाही पत्रकार संघाने लोकरत्न पुरस्कारासाठी निवड केली आहे.गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करत असताना त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून अनेक विधवा,परितक्ता,गोरगरीब महिलांचे शिक्षण तथा वेगवेगळ्या व्यवसायाचे प्रशिक्षण आणि त्याचबरोबर अनेक महिलांचे उद्योग व्यवसाय उभा केले आहेत.
त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम केले आहे.महिलांचा आर्थिक विकास होण्यासाठी त्या सतत धडपड करत असतात. त्याचबरोबर त्यांनी अनुसूचित जाती-जमाती समाजातील जे मुल शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य त्या करत असतात.त्याचबरोबर कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना आज त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित दादा पवार गट) महिला आघाडी केज तालुकाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.त्यांच्या निवडीबद्दल सामाजिक, राजकीय क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.