ऊसतोड कामगारांच राजकारण करणारे पुढारी कुठे आहेत-राजेश घोडे


माजलगाव :प्रतिनिधी

Advertisement

गेवराई तालुक्यातील खेरडा वाडी या गावांमध्ये गेल्या चार दिवसापूर्वी पाच ऊसतोड कामगारांची घर अक्षरशा जळुन राख रांगोळी झाली व या जळत्या घरामध्ये वालाबाई शहाजी भिसे नावाच्या ऐंशी वर्षाच्या आजी अक्षरशा जळून खाक झाल्या परंतु या ऊसतोड कामगारांच्या भेटीसाठी जिल्ह्यातील कुठलाही राजकीय पुढारी गेलेला नाही.स्वतःला ऊसतोड कामगारांचे नेते म्हणून घेणारे व ऊसतोड कामगारांच्या मतावरती डोळा ठेवून त्यांची मतं स्वतःच्या झोळीत पाडून घेण्यासाठी प्रयत्न करणारा एक ही पुढारी या ठिकाणी भेटीसाठी गेलेला नाही हे दुर्दैव आहे एवढेच नाही तर गेवराई तालुक्याचे आमदार लक्ष्मण पवार हे देखील या ठिकाणी गेलेले नाहीत सर्व पुढार्‍यांचा आम्ही कर्मवीर एकनाथ आव्हाड ऊसतोड कामगार संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो व पुढील काळामध्ये ऊसतोड कामगारांची मतं मागण्यासाठी फिरत असताना याचा जाब यांना नक्कीच विचारला जाईल. आज तगायत या जळीत प्रकरणातील एकाही कुटुंबाला शासनाकडून मदत मिळालेले नाही एवढा भयान दुर्दैवी प्रकार घडूनही घरातील संसार उपयोगी वस्तू धान्य रेशन व शेतीमाल कपडे असं सर्व जळून राख रांगोळी होऊन देखील सरकार कसलीही मदत करत नाही. खऱ्या अर्थाने हृदय नसणारी राजकीय पुढारी व सरकारी यंत्रणा या बीड जिल्ह्यात राहतात की काय असा प्रश्न पडतो म्हणून येणाऱ्या काळात ऊसतोड कामगारांचा संघटन मजबूत उभा करून राजकीय पुढार्‍यांना आम्ही जाब विचारू या कुटुंबाची भेट कर्मवीर एकनाथ आव्हाड ऊसतोड कामगार संघटनेचे अध्यक्ष राजेश घोडे मानवी हक्क अभियानाचे महादेव उमाप बंडू खंडागळे अनिकेत वाघमारे दगडू लोखंडे आदी कार्यकर्त्यांनी भेट घेतली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!