रमेश तात्या गालफाडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून होणार साजरा !
पदाधिकारी व कार्यकर्त्यांना गालफाडे यांचे आव्हान
बीड:प्रतिनिधी
बहुजन विकास परिषद चे संस्थापक अध्यक्ष रमेश तात्या गालफाडे यांचा दि.१२ जानेवारी २०२४ रोजी वाढदिवस आहे.रमेश गालफाडे यांनी ठोक भूमिका घेत कार्यकर्त्यांना आव्हान केले आहे की,आपण आपल्या भागातील शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व रुग्णालयात फळ वाटप,तसेच रक्तदान शिबिर-‘जीवनदान देण्यासाठी रक्ताची अतिशय गरज असते.आपल्याकडे अनेक वेळा रक्तपुरवठा अपुरा असतो आणि रक्तदाते शोधावे लागतात म्हणूनच हे शिबिर अत्यंत महत्त्वाचे आहे. गरजूंसाठी रक्ताचा साठा उपलब्ध करून देण्यासाठी शिबिराचे आयोजन गरजेचे आहे.
म्हणून गरजूंना किराणा किट,साडी,खाऊ वाटप करून वाढदिवसानिमित्त उपक्रम राबवावे. डिजिटल बॅनर वर तसेच आपण मला हारतुरे, बुके घेऊन न येता आपण गरजूंना मदत करावी.मराठा योद्धे मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आमरण उपोषणास बसले होते.त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र पिजून काढत आहेत.मराठा बांधव आरक्षणासाठी रात्रीचा दिवस करतात आणि मराठा बांधव हे आपल्यापैकीच आहेत.ही भूमिका मनात ठेवून तसेच वेळोवेळी मराठा समाजाच्या आरक्षणा साठी केजच्या बहुजन विकास परिषदच्या कार्यक्रमात व केज तहसील कार्यालया समोर उपोषणाला बसलेल्या मराठा बांधवांना रमेश तात्या गालफाडे यांनी पाठिंबा दिला होता.
मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येते मोठी सभा घेतली होती त्या ठिकाणी सभेत सहभागी होऊन पाठिंबा देखील दिला होता. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून रमेश तात्या गालफाडे व्यासपीठावर सातत्याने भूमिका घेत असतात.मराठा बांधव आरक्षणासाठी रात्रीचा दिवस करत आहेत म्हणून मला वाढदिवस साजरा करणे अपेक्षित नाही म्हणून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना रमेश तात्या गालफाडे सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करा असे आव्हान केले.
बीड मध्ये रक्तदान शिबिराची आयोजन !
बहुजन विकास परिषद संस्थापक अध्यक्ष रमेश तात्या गालफाडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरांचे निवेदन बीड जिल्हा शासकीय रुग्णालय येथे आयोजित करण्यासाठी दि.९ जानेवारी २०२४ रोजी जिल्हा रुग्णालय येथे देण्यात आले.यावेळी उपस्थित मराठवाड्याचे उपाध्यक्ष डॉ.चंद्रशेखर गवळी,जिल्हाध्यक्ष गोरख भाऊ मोमीन,जिल्हा संपर्कप्रमुख मसु भाऊ पवार,कार्याध्यक्ष सुधाकर कानडे,युवक जिल्हाध्यक्ष अंकुश दामू रोकडे,जातेगाव सर्कलप्रमुख रमेश रोकडे,ज्येष्ठ मार्गदर्शक मिलिंद दादा गालफाडे, उपजिल्हाध्यक्ष ज्ञानदेव लोंढे,मराठा संघटक भास्करराव,युवा तालुका अध्यक्ष अजय थोरात, युवा तालुका अध्यक्ष विनोद मोरे,महिला जिल्हा सचिव प्रियंका धुतडमल हे सर्व मान्यवर उपस्थित होते.