छत्रपती शेतकरी गटाने तयार केली जमाखर्च नोंदवही ; कृषि अधिकारी,गटविकास अधिकारी,तहसील प्रतिनिधींच्या हस्ते प्रकाशन
कृषी विभाग शेतकऱ्यांच्या पाठीशी-कृषि अधिकारी सागर पठाडे
केज:प्रतिनिधी
तालुक्यातील आनंदगाव येथील छत्रपती शेतकरी गट यांनी शेतकरी जमाखर्च नोंदवही तयार केली.नोंदवहीचे प्रकाशन केज पंचायत समिती सभागृहात उपस्थितांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुका कृषी अधिकारी सागर पठाडे,पंचायत समितीच्या सह गटविकास अधिकारी सविता शेप,तहसील प्रशासन प्रतिनिधी जी पी नन्नवरे,कनिष्ठ प्रशासन अधिकारी अजय ढोकर,छत्रपती गटाचे प्रतिनिधी शंकर शिंदे, पाथरा गटाचे मनोराम पवार,डॉ लक्ष्मीकांत तपसे,काकासाहेब कोल्हे,श्रीमती ओव्हाळ आदींच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
तालुक्यातील शेतकऱ्यांना या नोंद वह्या भेट दिल्या.वहीमध्ये वर्षभरात शेतीसाठी होणारा खर्च आणि जमा त्याचा हिशोब नोंदवता येणार आहे.वहीच्या वरच्या बाजूला वर्षभरात करण्यात येणाऱ्या शेतीच्या आधुनिक पद्धती विषयक माहिती,गट शेतीच्या माध्यमातून केलेल्या प्रयोगाचे फोटो प्रकाशित करण्यात आले आहेत.यावेळी बोलताना तालुका कृषी अधिकारी पठाडे म्हणाले गटाने केलेला हा प्रयोग सर्व शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल जमाखर्च नोंद ठेवने खूप महत्त्वाचे आहे.शेतकरी या गटाचे अनुकरण करावे. कृषी विभाग गटांच्या पाठीशी आहे विविध योजना पोहोचवण्या साठी आम्ही तत्पर आहोत असे मत व्यक्त केले.
श्रीमती शेप म्हणाल्या शेतकऱ्यांना प्रयोगशील पद्धतीने शेती करण्यासाठी छत्रपती गटाची प्रेरणा उपयुक्त ठरेल. उत्पादन आणि खर्च यांचा हिशोब गरजेचा असतो.नोंदवहीवरील पद्धती ची माहिती शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत राहील. असे मत व्यक्त केले. विविध गटांच्या वतीने मनोरम पवार यांनी शुभेच्छा दिल्या. तालुक्यातील चंदन सावरगाव भूमिपुत्र शेतकरी गट पाथरा येथील बळीराजा शेतकरी गट,सखी समृद्ध महिला शेतकरी गट पाथरा,कृषिरत्न शेतकरी गट,कृषी वैभव उत्पादक शेतकरी गट केवड ,जय किसान महिला शेतकरी गट कानडी माळी आदी शेतकरी गटाचे प्रतिनिधी कार्यक्रमास उपस्थित होते.मृदा पूजन करून उपस्थितांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गटाचे अध्यक्ष अरुण गायकवाड,सचिव गणेश राऊत,हरिदास गायकवाड, समाधान पौळ,दत्ता गायकवाड, किरण कदम,अर्जुन कदम,ईश्वर करपे,नितीन कदम आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.हनुमंत सौदागर यांनी केले.आभार शंकर शिंदे यांनी मानले.
कृषी सहाय्यकांना बक्षीस
तालुक्यातील कृषी सहायक चांगले काम करत आहेत.त्यांनी राबवलेल्या योजना त्यांचे नवोपक्रम,उत्कृष्ट कार्य केल्याची नोंद घेतली जाणार आहे.समिती मार्फत शेतकऱ्यापर्यंत पोहोच केलेल्या विविध योजना त्यांच्या कामाचे योग्य मूल्यमापन करून उत्कृष्ट काम करणाऱ्या एका कृषी सहाय्यक यांना छत्रपती शेतकरी गट आनंदगाव मार्फत रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात येणार अशी घोषणा गटामार्फत करण्यात आली.