बहुजन विकास परिषदच्या गेवराई तालुक्यात नुतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी !
मराठा संघटक पदी भास्कर धुरंदरे यांची निवड
बीड : प्रतिनिधी
बहुजन विकास परिषद महाराष्ट्र राज्यया संघटनेची (दि.२५) डिसेंबर २०२३ रोजी गेवराई येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकी दरम्यान विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून बहुजन विकास परिषद संघटनेचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम आगामी काळात करणार असल्याचे मत याप्रसंगी नवनियुक्त पदाधिकाऱ्याकडून व्यक्त करण्यात आले.
बहुजन विकास परिषदच्या मराठा संघटक पदी भास्कर धुरंदरे यांची निवड तर बहुजन विकास परिषद गेवराई युवक तालुका अध्यक्ष विनोद भैय्या मोरे,बहुजन विकास परिषद गेवराई युवक शहराध्यक्षपदी अजित चव्हाण तर युवक शहर उपाध्यक्ष अशोक माळवदे यांची निवड करण्यात आली. बहुजन विकास परिषदचे संस्थापक रमेश तात्या गालफाडे यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा उपाध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर गवळी व बीड जिल्हाध्यक्ष गोरख भाऊ मोमीन व युवक जिल्हाध्यक्ष अंकुश दामू रोकडे यांच्या उपस्थितीत गेवराई तालुक्यातील नुतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.याप्रसंगी मसू पवार संपर्कप्रमुख बीड जिल्हा,सुधाकर कानाडे कार्याध्यक्ष,ज्ञानदेव लोंढे जिल्हा उपाध्यक्ष,अजित थोरात तालुका अध्यक्ष,ऋषिकेश धुताळमंड जिल्हा युवक सचिव अशोक भाकरे संपर्कप्रमुख रवींद्र क्षीरसागर याच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
लवकरच गेवराई तालुक्यात दौरा काडून गाव तिथे शाखा करण्यात येणार असून या तालुक्यात बहुजन विकास परिषद महाराष्ट्र राज्य या संघटनेची पुनःबींधणी करण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष गोरख मोमीन यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी बाबूराव साबळे-पांगरी,जितेंद्र हातागळे-आनंदवाडी, रमेश रोकडे-डोईफोडवाडी,बाळू साबळे-तलवाडा,नवनाथ साबळे-गेवराई,महादेव रोकडे-गेवराई,महेश रोकडे-गेवराई, भिवाजी हातागळे-तलवाडा,अक्षय हातागळे-गेवराई,प्रशांत चोतमल-गेवराई,अजय चव्हाण-गेवराई,प्रशांत उमप याच्यासह अनेकन कार्यकर्ते उपस्थित होते.