महिला व विद्यार्थ्यांनींनी मनुस्मृती दहन करत स्त्री मुक्ती दिन कार्यक्रम साजरा-डॉ.गणेश ढवळे
लिंबागणेश-प्रतिनिधी
बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे आज दि.२५ डिसेंबर रोजी पंचशील नगर येथे माता रमाई , डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे आणि संविधान ग्रंथाचे पुजन करत मनुने मनुस्मृतीच्या माध्यमातून स्त्रियांना सामान्य जीवन जगण्याचा हक्क नाकारून पुरुष प्रधान संस्कृती बळकट करणा-या तसेच बहुजण आणि स्त्रीयांना शिक्षणाचा अधिकार नाकारणा-या शोषणात्मक धार्मिक मजकूर असलेल्या स्त्रिया आणि बहुजनांवर वर्षानुवर्षे गुलामी आणि अपमाना स्पद जीवन जगण्याचे आणि हे आपल्या धर्मातच आहे असा गैरसमज वाढवुन अत्याचार सहन करण्याची मानसिकता तयार करणाऱ्या मनुस्मृती ग्रंथाचे महिला व शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या पुढाकाराने प्रतिकात्मक स्वरुपात दहन करण्यात येऊन मनुस्मृती दहन दिन अर्थातच स्त्री मुक्ती दिवस कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी वर्षा गायकवाड, सुनिता निर्मळ, योगिनी निर्मळ,सुशीला निर्मळ, दिव्या निर्मळ, सोनल निर्मळ,सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे,प्रा.लेहनाजी गायकवाड,आंबेडकरवादी नेते रविबापु निर्मळ,सुरेश निर्मळ,पप्पु निर्मळ, उमाजी निर्मळ,ज्ञानोबा निर्मळ, बाबासाहेब निर्मळ,तेजस काटे,बबन सोनावणे,स्वप्निल वक्ते, नितीन सिरसट,पवन निर्मळ,अमोल जाधव,दत्ता जाधव,अनिकेत निर्मळ,प्रमोद निर्मळ,श्रीकांत निर्मळ, सुमित निर्मळ,कृष्णा निर्मळ,गणेश निर्मळ आदि उपस्थित होते.
सविस्तर माहितीस्तवआधुनिक भारताचे जनक महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो लोकांच्या साक्षीने दि.२५ डिसेंबर १९२७ रोजी महाडच्या चवदार तळ्याचा खुला वापर आणि काळाराम मंदिर प्रवेश पार्श्वभूमीवर जातीभेद आणि स्त्रीदास्य या दोन्हींच्या अंतासाठी संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त करत भेदभाव आणि शोषणाला समर्थन देणा-या विचारसरणीच्या विरोधात आणि परस्पर आदर यावर आधारित समाज निर्माण करण्याचे उद्दिष्ट मनात ठेवून दलित आणि स्त्रीयांसाठी आत्मसन्मान ठळक करण्याचा मुक्तीचा मार्ग म्हणून महाड येथे शोषणात्मक धार्मिक मजकूर सार्वजनिक रित्या प्रतिकात्मक अंत्यसंस्काराच्या चितेमध्ये जाळला होता.या घटनेच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी २५ डिसेंबर “मनुस्मृती दहन दिन म्हणून राज्यात आणि देशात अनेक ठिकाणी मनुस्मृती जाळण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात.
स्त्रीयांना शिक्षण व इतर मुलभूत अधिकार नाकारणा-या शोषित ग्रंथाचे दहन करून स्त्री मुक्ती दिवस साजरा:- वर्षा गायकवाड
स्त्रिया अपवित्र असुन त्यांना शिकायचा,शिकवायचा अधिकार नाही, स्त्रीयांना जनावरासारखे मारता येऊ शकते, स्त्रीयांचा संपत्ती ,मिळकतीवर अधिकार नाही, नारी मग ती पुत्री, पत्नी,माता कन्या,युवती, वृद्ध कोणत्याही स्वरूपात असो कधीच स्वतंत्र व्हायला नको, पती पत्नीचा केव्हाही त्याग करु शकतो, गहाण ठेवु शकतो आदि स्त्रीयांना गुलामीचे जीवन जगण्यासाठी प्रवृत्त करणा-या ग्रंथाचे दहन करून बाबासाहेबांनी स्त्रीयांना गुलामगिरीतून मुक्त केले होते त्यामुळे हा दिवस “स्त्री मुक्ती दिवस” म्हणून साजरा करण्यात येतो.