दिव्यांग वित्त महामंडळाच्या मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्या-नानासाहेब घोडके


माजलगाव : अनंत घडसिंगे

महाराष्ट्रातील सर्व समाजातील मुक बधीर दिव्यांगांच्या अर्थिक व सामाजिक विकासासाठी व त्यांच्या जीवनमाना चा दर्जा उंचावण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा उपक्रम दिव्यांग वित्त व विकास महामंडळ सुरू आहे.दिव्यांगना व्यवसायामध्ये सक्षम उभे करण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून महिल, पुरुषा करीता थेट योजना पन्नास हजार ते पाच लाख रुपयांची असुन याची अधिक माहिती देण्यासाठी ३०डिसेंबर रोजी माजलगाव शहरातील संत रविदास महाराज सभागृह, बायपास रोड येथे मार्गदर्शन शिबिरास उपस्थित रहावे असे आवाहन रा.च.मे. बीड जिल्हा अध्यक्ष नानासाहेब घोडके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Advertisement

पत्रकात पुढे नमुद केले आहे की, मुदत कर्ज, शैक्षणिक कर्ज,सुक्षम पत पुरवठा,बीज भांडवल योजना,विहीर मोटर पाइपलाइन इ. योजनेची माहिती या शिबिरातुन मार्गदर्शन केले जाणार आहे.सविस्तर माहिती देण्यासाठी दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे अधिकारी बीड यांच्या उपस्थितीमध्ये दिव्यांग वंचित घटकांना मार्गदर्शन करणार आहेत तर भाजपचे माजलगाव विधान सभा प्रमुख मोहनराव जगताप यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या शिबाराचे उद्घाटन रा.च.म.चे राज्य प्रवक्ते रोहीदास बनसोडे यांच्या प्रमुख मार्गदर्शन जिल्हा व्यवस्थापक विजय राठोड करणार आहेत.यासाठी एन.डी. शिंदे मराठवाडा उपाध्यक्ष राचम. सह दिपक मुंडे माजी नगराध्यक्ष, बाळासाहेब तौर,राचम.चे गणेश गवळी माजी युवा मराठवाडा अध्यक्ष,राजेश जाधव युवा जिल्हाध्यक्ष,रमेश जगताप जिल्हा संपर्कप्रमुख,अशोक वाडेकर कर्मचारी जिल्हाध्यक्ष,राजू ऊनवणे उपजिल्हाप्रमुख, सुनील खंडागळे माजी उपनगराध्यक्ष, सुनील शिंदे सचिव रोटरी क्लब माजलगाव,दिलीप सोनवणे उद्योजक,पद्माकर कांबळे उद्योक, किशोर गायकवाड उपजिल्हाध्यक्ष,राधाकिसन भाळशंकर संघटक,सुभाष कांबळे तालुकाध्यक्ष,मधुकर ठोसर वडवणी तालुकाध्यक्ष,संतोष जाधव,विजय नरहिरे, संतोष खंडागळे,अर्जुन पोहेकर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!